शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 27/07/2016*
(सदर पोस्ट आपण असलेल्या सर्व ग्रुप मध्ये त्वरित share करावी ही विनंती)

*प्रमोशन कसे करावे या बाबत दिनांक 27 जुलै 2016 ची अपडेट माहिती:*

खालील प्रमाणे विद्यार्थ्याचे प्रमोशन करावे

मॅन्युअली प्रमोशन करताना 10  वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्वाची सूचना आहे.
🔸अ) 10 वी ला जोडून 11 वी असलेल्या (एकच udise असलेल्या )शाळेसाठी सूचना : 

 अशा शाळांनी जी 10 वी पास झालेली मुले आपल्याच शाळेत असलेल्या 11 वी ला असणार आहे त्यांनी प्रमोट करताना same school चा ऑप्शन निवडावा आणि सर्वप्रथम अशा मुलांना प्रमोट करून घ्यावे.तसेच जी पास झालेली मुले आहेत परंतु 11 वीला दुसर्या शाळेत जाणार आहे अशा मुलांना different school चा ऑप्शन निवडून  एका टेबल मध्ये तात्पुरते प्रमोट करावे म्हणजेच त्यांची माहिती फक्त save करावी.अशी मुले आपल्या 11 वीच्या वर्गातल्या पटात दिसनार नाही.अशी मुले तात्पुरत्या स्वरूपात एका table मध्ये ठेवले जाणार आहे.जेंव्हा या मुलांसाठी इतर शाळेतून ट्रान्सफर साठी  request येईल तेंव्हा त्या मुलांना आपण ट्रान्सफर करावे.जरी त्यांची ट्रान्सफर साठी request आली नाही तरी ते मुले त्याच वेगळ्या टेबल मध्ये असतील आणि शाळेच्या एकूण पटात मोजली जाणार नाही याची नोंद घ्यावी.अशा शाळांमध्ये एका पेक्षा अधिक जनरल रजिस्टर असल्यास 11 वी ला जनरल रजिस्टर बदल झालेला असतो तशी ऑनलाइन मध्ये देखील नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

🔸ब)10 वी ला जोडून 11 वी असलेल्या शाळासाठी (परंतु udise वेगवेगळा असलेली शाळा) सूचना :

 आपला udise वेगवेगळा आहे म्हणजे आपल्या दोन वेगवेगळ्या शाळा आहे असे समजुनच आपण ही प्रक्रिया पार पडणार आहोत.सर्वप्रथम प्रमोशन मध्ये जाऊन 10 वीच्या सर्व मुलांची माहिती भरून घ्यायची आहे.या ठिकाणी आता same school अथवा different school असा ऑप्शन दिसून येणार नाही.(ज्या शाळांना 11 वी चा वर्ग जोडून आहे अशाच शाळांना तो ऑप्शन दिसणार आहे याची नोंद घ्यावी.)सर्व मुलांची माहिती भरून झाली की सर्वात शेवटी save record असे बटन दिसून येईल.याचा अर्थ असा आहे की सदर सर्व मुलांची माहिती ही 10 वीच्या वर्गातून निघून जाऊन ते माहिती एका विशिष्ट table मध्ये ठेवण्यात आलेली आहे.ज्या मुलांच्या ट्रान्सफरच्या request येतील अशा मुलांच्या request आपण कन्फर्म करू शकाल याची नोंद घ्यावी.अशा प्रकारे आता 11 वी च्या udise नंबर ने लॉगिन करून ज्या मुलांना आपल्या 11 वी ला प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांसाठी ट्रान्सफर साठी request पाठवून नेहमीच्याआ पद्धतीने ट्रान्सफर करून घ्यावे.

🔸क) फक्त 10 वी पर्यंत असलेल्या शाळासाठीची सूचना : 

सर्वप्रथम प्रमोशन मध्ये जाऊन 10 वीच्या सर्व मुलांची माहिती भरून घ्यायची आहे.या ठिकाणी आता same school अथवा different school असा ऑप्शन दिसून येणार नाही.(ज्या शाळांना 11 वी चा वर्ग जोडून आहे अशाच शाळांना तो ऑप्शन दिसणार आहेए याची नोंद घ्यावी.)सर्व मुलांची माहिती भरून झाली की सर्वात शेवटी save record असे बटन दिसून येईल.याचा अर्थ असा आहे की सदर सर्व मुलांची माहिती ही 10 वीच्या वर्गातून निघून जाऊन ते माहिती एका विशिष्ट table मध्ये ठेवण्यात आलेली आहे.ज्या मुलांच्या ट्रान्सफरच्या request येतील अशा मुलांच्या request आपण कन्फर्म करू शकाल तसेच ही सर्व मुले आपल्या पटात धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.याच प्रकारे 12 वी च्या मुलांचे प्रमोशन करावयाचे आहे.

🔸ड)10 वी मध्ये नापास झालेल्या,शाळा सोडून गेलेल्या,परीक्षेस गैरहजर असलेल्या मुलाच्या बाबतीत सध्या प्रमोट करताना पुढील सुचना येईपर्यंत काहीही करू नये याची गाम्भिर्याने नोंद घ्यावी.10 वी च्या बाबतीत सध्या फक्त पास झालेल्या मुलांना प्रमोट करून घेण्याची प्रक्रिया त्वरित पार पाडावयाची आहे.

2)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 3) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल : 
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा 
c)support.education@maharashtra.gov.in   

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com