शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

सरल student पोर्टल अपडेट दि 25 जुलै 2016

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 25/07/2016*
*(सदर पोस्ट आपण असलेल्या सर्व ग्रुप मध्ये त्वरित share करावी ही विनंती)*

*Student पोर्टल*

1) ज्या विद्यार्थ्याची मागील वर्षी माहिती भरताना अथवा ट्रान्सफर करताना किंवा प्रमोट करताना इयत्ता व तुकडी चुकली आहे अशा विद्यार्थ्याच्या नोंदी दूरस्थ करण्यासाठी *maintenance* या tab मध्ये *update student  data* या नावांच्या subtab द्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.या सुविधेद्वारे आपण मुलांची इयत्ता चुकली असेल तर एक वर्ग मागे अथवा एक वर्ग पुढे नोंद दूरस्थ करू शकता.एका पेक्षा अधिक वर्ग मागे अथवा पुढे जायचे असेल तर हीच प्रक्रिया तेवढ्या अधिक वेळा पुन्हा पुन्हा करून आपण इयत्ता बदल कर शकाल.ही सुविधा काही दिवसासाठीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घेऊन आपले काम त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

2) मॅन्युअली प्रमोशन करताना 10  वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्वाची सूचना आहे.
अ) *10 वी ला जोडून 11 वी असलेल्या (एकच udise असलेल्या )शाळेसाठी सूचना* :  अशा शाळांनी जी 10 वी पास झालेली मुले आपल्याच शाळेत असलेल्या 11 वी ला असणार आहे त्यांनी प्रमोट करताना same school चा ऑप्शन निवडावा आणि सर्वप्रथम अशा मुलांना प्रमोट करून घ्यावे.तसेच जी पास झालेली मुले आहेत परंतु 11 वीला दुसर्या शाळेत जाणार आहे अशा मुलांना different school चा ऑप्शन निवडून एका आभासी वर्गात तात्पुरते प्रमोट करावे.जेंव्हा या मुलांसाठी इतर शाळेतून ट्रान्सफर साठी  request येईल तेंव्हा त्या मुलांना आपण ट्रान्सफर करावे.जरी त्यांची ट्रान्सफर साठी request आली नाही तरी ते मुले त्याच आभासी वर्गात असतील आणि शाळेच्या एकूण पटात मोजली जाणार नाही याची नोंद घ्यावी.अशा शाळांमध्ये एका पेक्षा अधिक जनरल रजिस्टर असल्यास 11 वी ला जनरल रजिस्टर बदल झालेला असतो तशी ऑनलाइन मध्ये देखील नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ब) *10 वी ला जोडून 11 वी असलेल्या शाळासाठी (परंतु udise वेगवेगळा असलेली शाळा) सूचना* : आपला udise वेगवेगळा आहे म्हणजे आपल्या दोन वेगवेगळ्या शाळा आहे असे समजुनच आपण ही प्रक्रिया पार पडणार आहोत.सर्वप्रथम 10 वी च्या शाळेने आपली पास झालेली मुले different school चा ऑप्शन निवडून एका आभासी वर्गात तात्पुरते प्रमोट करावे.आणि 11 वी च्या udise नंबर ने लॉगिन करून ज्या मुलांना आपल्या 11 वी ला प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांसाठी ट्रान्सफर साठी request पाठवून नेहमीच्याआ पद्धतीने ट्रान्सफर करून घ्यावे.

क) *फक्त 10 वी पर्यंत असलेल्या शाळासाठीची सूचना* : अशा शाळेने आपल्या शाळेतील मुलांना प्रमोट करत असताना different school चा ऑप्शन निवडून उत्तीर्ण झालेल्या मुलांना आभासी 11 वी च्या वर्गात प्रमोट करावे.जेंव्हा त्या मुलांची ट्रान्सफर request आपणास प्राप्त होईल तेंव्हा ही मुले आपण ट्रान्सफर करावीत,ज्यांची request येणार नाही त्या मुलांच्या बाबतीत सध्या काहीही करू नये.ही सर्व मुले आपल्या पटात धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3)10 वी मध्ये नापास झालेल्या,शाळा सोडून गेलेल्या,परीक्षेस गैरहजर असलेल्या मुलाच्या बाबतीत सध्या प्रमोट करताना पुढील सुचना येईपर्यंत काहीही करू नये याची गाम्भिर्याने नोंद घ्यावी.10 वी च्या बाबतीत सध्या फक्त पास झालेल्या मुलांना प्रमोट करून घेण्याची प्रक्रिया त्वरित पार पाडावयाची आहे.

4)अंतिम मुदतीच्या काळात user ची संख्या क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने सर्वर वर ताण आल्याने पोर्टल बंद अथवा स्लो झाल्याचे किंवा लॉगिन न होणे असे दिसून येते.तरी मुदत संपण्याच्या अंतिम दिवसाची वाट न पहाता त्या आधीच काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.आगामी काळात होणाऱ्या चाचणी परीक्षेच्या गुणांची नोंद student पोर्टल ला दिलेल्या मुदतीत घ्यावी लागणार असल्याने student ट्रान्सफर आणि प्रमोशन व इतर कामे त्वरित पूर्ण करून घ्यावे.अन्यथा आपल्या अपूर्ण कामामुळे संचमान्यता सारख्या महत्वाच्या बाबींवर याचा परिणाम पडू शकतो.

5)सध्या प्रमोट करताना काही शाळांना error येत आहे,ही समस्या आज दुपार पर्यंत सोडवली जाणार आहे.

6)तसेच आज student पोर्टल ची अंतिम मुदत आहे तरी काही शाळांचे अद्यापही काम अपूर्ण आहे हे लक्षात घेऊन  मा. सुनिल मगर साहेब (अध्यक्ष ई-गव्हर्नन्स सेल) यांच्या आत्ताच देण्यात आलेल्या सूचनेनुसार ती मुदत आज वाढवण्यात येईल असे या post द्वारे कळवण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

*MDM पोर्टल* :

7) MDM ची माहिती भरन्यासाठी आपण जे अँड्रॉइड APP वापरतो ते APP जर जुने असेल तर आपण भरलेल्या माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकते असे लक्षात आलेले आहे.त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असलेले जुने APP DELETE करावे आणि  सध्या MDM च्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेले UPDATED APP इन्स्टॉल करून घ्यावे अशा सूचना सर्वांना या देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.

8) आपण एखाद्या शाळेकडून शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशीच धान्य उसने घेतले असेल तर ते ओपनिंग बॅलन्स मध्ये मायनस म्हणून नोंद करावयाचे आहे.शाळा सुरु झाल्यानंतर जर आपणास माल कमी पडला म्हणून आपण उसना घेतला असेल तर त्या मालाची नोंद ही स्टॉक इनवॉर्ड या फॉर्म मध्ये घ्यायची आहे.त्या फॉर्म मध्ये आपन कोणाकडून तांदूळ उसना घेतला आहे याची देखील नोंद घ्यायची आहे.जेंव्हा आपल्याकडे धान्य पुरवठादारामार्फत पुरवले जाईल तेंव्हा आपण जेवढे धान्य आले त्याप्रमाणेच नोंद स्टॉक इनवॉर्ड या फॉर्म मध्ये घ्यायची आहे.जरी आपण शेजारच्या शाळेकडून तांदूळ उसना घेतला असेल तरी ते धान्य कमी करून मग नोंद घेण्याची आवश्यकता नाही आहे याची नोंद घ्यावी.आणि आपण घेतलेला उसना तांदूळ देखील त्या शाळेला परत करावयाची गरज नाही आहे हे देखील लक्षात घ्यावे.आपण ज्या शाळेकडून धान्य उसने घेतो त्या शाळेचा udise नंबर सिस्टिम मध्ये भरत असतो तेंव्हा ज्या शाळेतून धान्य उसने घेतले जाते त्या शाळेचा स्टॉक देखील सिस्टिम कडून मेन्टेन केला जाणार आहे त्यामुळे आपण त्यांना धान्य परत करण्याची आवश्यकता नाही आहे हे लक्षात घ्यावे.सर्व शाळांना शासनामार्फतच धान्य पुरवले जाते त्यामुळे उसना घेतलेला माल हा परत करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.मात्र उसने घेतलेले वा दिलेले साहित्याची नोंद आपल्या रजिस्टर ला माहितीसाठी करून ठेवावी.

9) ज्या शाळेने ओपनिंग बॅलन्स भरला आहे आणि beo लॉगिन मधून देखील finalize झालेले आहे अशा शाळांना जर आपल्या शाळेत वर्ग वाढला असेल तर आपल्या नवीन वाढलेल्या वर्गाची नोंद beo लॉगिन मधून घेता येत नाही आहे.यासाठी beo लॉगिन मधून finalize झालेल्या या नोंदी *शिक्षणाधिकारी* लॉगिन मधून दूरस्थ करून घ्याव्यात आणि वर्ग वाढल्याची नोंद करुन घ्यावी.तशी सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या mdm लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

10)ज्या शाळांचा ओपनिंग बॅलन्स भरताना चुका झालेल्या आहेत अशा शाळांना दुरुस्थिसाठी लवकरच थोड्या कालावधीसाठी तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,याची नोंद घ्यावी.अशा शाळांनी पुढील सुचनेची वाट पहावी.तसेच ज्यांनी ओपनिंग बॅलन्स अद्यापही भरलेला नाही आहे अशा शाळांना आज अखेरची मुदत दिलेली आहे परंतु ही मुदत 2 दिवस म्हणजेच 27 जुलै पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.यानंतर मुदत वाढवण्यात येणार नाही असे कळवण्यात आलेले आहे.

*School पोर्टल*

11) येत्या 2 दिवासात सन 2016-17 ची नव्याने माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टल आपणास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी सर्वर वर का करण्यासाठी तात्पुरते स्कूल पोर्टल बंद ठेवण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.

12) सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या *havelieducation.blogspot.in* या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).

13)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 14) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364